म.न.पा.यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर शाळेमध्ये शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न.

0
74

मुलांच्या बौद्धिक व मानसिक विकासाबरोबर शारीरिक विकास योग्य रितीने होणे आवश्यक आहे. यासाठी म.न.पा.यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर या शाळेमध्ये शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन प्राथमिक शिक्षण समितीचे शैक्षणिक पर्यवेक्षक श्री.विजय माळी सर यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी राष्ट्रीय खेळाडू प्राजक्ता सुर्यवंशी या उपस्थित होत्या.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.गीता काळे मॅडम म्हणाल्या, ” मुलांनी ज्येष्ठ खेळाडूंचा आदर्श घेऊन एखाद्या खेळामध्ये स्वतः प्राविण्य मिळवावे. खेळ हे आपल्या व्यक्तीमत्त्व विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात .

” या शालेय क्रीडा स्पर्धेत धावणे, शटल रिले, कब्बडी, लंगडी, पोटॅटो रेस, लिंबू – चमचा या खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. इयत्ता पहिली ते इयत्ता सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

शैक्षणिक पर्यवेक्षक श्री. विजय माळी सर म्हणाले , ” मुलांना शालेय जीवनात खेळायला आवडते. त्यामुळे त्यांचा शारीरिक विकास योग्य गतीने होतो व मुले अभ्यासातही रमतात.

अशा क्रीडास्पर्धामुळे मुलांमधील क्रीडा कौशल्य समजण्यास मदत होते. मुलांना क्रीडाविषयक मार्गदर्शन करणे सोपे होते. मुलांनी खिलाडीवृत्तीने खेळ खेळावेत .” राष्ट्रीय खेळाडू डाॅ. प्राजक्ता सुर्यवंशी म्हणाल्या, ” कोणत्याही खेळातील यशाचा पाया हा शाळेत घेतल्या जाणाऱ्या खेळांमध्येच असतो.

खेळ हे आत्मविश्वास वाढवतात. मुलांनी यश अपयश न मानता खेळ आनंदाने खेळावेत. ” डी. एड्. काॅलेज, पेटाळा येथील प्राध्यापिका सौ. ज्योती जांभळे – पाटील यांनी आपल्या मनोगतातून खेळांचे मानवी जीवनातील महत्व सांगितले.

डी. एड् काॅलेज, पेटाळा येथील छाञाध्यापकांनी खेळ घेण्यास अनमोल मदत केली. सर्वांनी यावेळी क्रीडा शपथही घेतली. यावेळी सौ. मंदाकिनी पाटील मॅडम, श्री. अरविंद मुरकुटे – पाटील सर , सौ. वैशाली कोळी मॅडम, सौ.वंदना भोपळे मॅडम, सौ. कविता रावळ मॅडम, सौ. वैशाली पाटील मॅडम, श्री. दिपक कुंभार सर, श्री. शिवाजी जाधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here