राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे
शाहूवाडी तालुक्यातील शितुर वारू न परिसरातील तळीचा वाडा येथील कुमारी सारिका बबन गावडे या शाळकरी मुलीवर बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याने त्या मुलीच्या कुटुंबांना एक कोटी नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागणीची निवेदन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांना माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर त्यांनी दिले आहे
या बाबत अधिक माहिती अशी की शीत्तूर वा रून परिसरातील तळीचा वाडा येथे 20 नोव्हेंबर 23 रोजी अचानक या गावांमध्ये बिबट्या प्रवेश करून कुमारी सारिका गावडे या शाळेकरी मुलीच्या घराजवळ आल्याने त्या बिबट्याने कुमारी सारिका गावडे या मुलीवर हल्ला केल्याने ती मयत झाली
त्या सारिका गावडे हिच्या कुटुंबांना शासनाकडून 25 लाख तुटपुंजी मदती ऐवजी एक कोटी रुपयाची आर्थिक मदत मिळावी व कुटुंबातील एका व्यक्ती ला सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावे तसेच चांदोली राष्ट्रीय उद्यानातील हिस्त्र वन्य प्राण्यांच्या बंदोबस्त साठी वनविभागाने जंगला सभोवती सौर कुपन करावे अशी मागणी माजी आमदार शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील व जिल्हा बँकेचे संचालक रणवीर सिंग गायकवाड यांच्या उपस्थितीत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि वनविभागाचे अधिकारी यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी आपल्या मागण्या साठी पाठ पुरावा करतो असे आश्वासन शिष्टमंडळांना देण्यात आले
तसेच चांदोली अभयारण्य लगतच्या गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून त्या पुनर्सना संदर्भात लोकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले
या शिष्टमंडळात विजय खोत दिलीप पाटील हंबीरराव पाटील भीमराव पाटील जालिंदर पाटील बाळासाहेब पाटील अरविंद पाटील नामदेव ढवळे इत्यादी तालुक्यातील कार्यकर्ते हजर होते