पाडळी बुद्रुक: येथील मधला माळ या परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन 

0
82

पाडळी बुद्रुक: येथील मधला माळ या परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन झाले. कुत्री भुंकत असल्यामुळे हा बिबट्या झाडावर जाऊन बसला होता. भैरवनाथ कळंत्रे व भरत कळंत्रे या मेंढपाळ बांधवांना हा बिबट्या दिसला.

त्यांनी तत्काळ सरपंच शिवाजी गायकवाड व वरणगे उपसरपंच राजेंद्र पाटील भिकाजी पाटील यांच्याशी संपर्क साधला.

त्यांनी वन विभागाशी संपर्क साधला असता वनविभाग व वन्यजीव रक्षक दलाची टीम व छत्रपती वाइल्ड लाईफ फाउंडेशन यांनी घटनास्थळी येवून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाला. बिबट्या पाहायला बघ्यांनी गर्दी केली. यावेळी बिबट्याच्या डरकाळीने नागरिकांची घाबरगुंडी उडाली.

सध्या ऊस तोडणी हंगाम सुरू आहे. त्यामुळे ऊस तोडणी मजूरांनी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यापासून काळजी घेणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here