बिळाशी येथील अंकुर रोपवाटिकेचे काम कौतुकास्पद – सिनेअभिनेते सयाजी शिंदे

0
411

SP9/ कोकरूड प्रतिनिधी

शिराळा तालुक्यातील बिळाशी येथील अंकूर रोपवाटिकेने ईतर वृक्षांसोबत वड, पिंपळ ,हुंबर या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर वृक्ष निर्मिती केली असून पर्यावरण समतोल राखण्यासाठी ही बाब महत्त्वाची आहे असे मत प्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी केले .

ते नेहरू उद्यान कोयनानगर येथील माजी वनपाल डी.के.यमगर यांच्याशी झालेल्या भेटी दरम्यान बोलत होते. यावेळी बोलताना सयाजी शिंदे पुढे म्हणाले की,

सध्या वातावरणातील मोठ्या प्रमाणातील बदल पहाता वृक्ष लागवड करून ती जतन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. बिळाशीचे माजी वनपाल डी.के .यमगर यांनी सेवानिवृत्ती नंतरही वृक्ष लागवडीसाठी काम करत आहेत.त्यांचे या क्षेत्रातील काम कौतुकास्पद आहे. यावेळी चंद्रकांत शेटे, शंकर भोसले, दत्तात्रय माने, सदाशिव यमगर, सुरेश मगदूम, जयवंत खराडे, धनाजी सुतार, तानाजी खांडेकर, अनिल लोहार आदींसह उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here