प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर: भुदरगड तालुक्याचा महसुली अभिलेखाचा लेखा -जोखा ठेवणारे उप अधीक्षक ,भुमी अभिलेख कार्यालय भुदरगड या कार्यालयाचे कामकाज हे भांड्याच्या इमारतीत सद्या सुरू आहे. सद्या वापर करण्यात येत असलेली इमारत अपुरी पडत असल्याने येथे कार्यरत असणारे अधिकारी कर्मचारी व तालुक्यातील येणारे नागरिक गैरसोय होत आहे. संबंधित कार्यालया करिता सुसज्ज व स्वतःच्या मालकीची इमारत बांधणे गरजेचे होते . या साठी राज्यसरकारकडे करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आले असून सदर कार्यालयाच्या इमारत बांधकामासाठी १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून हिवाळी अधिवेशनात १५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आमदार प्रकाश आबीटकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.