सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्र किनाऱ्यावर पुण्यातील सैनिक शाळेचे ४ विद्यार्थीनीचा बुडून मृत्यू १ बेपत्ता

0
86

प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमधून एक बातमी समोर आली आहे. देवगड समुद्र किनारी पर्यटनासाठी आलेले ५ पर्यटक बुडाले आहे. यामध्ये चौघांचे मृतदेह सापडले असून एक जण बेपत्ता आहे. मृत चारही जण पुण्यातील खासगी सैनिक अकॅडमीमधील विद्यार्थी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज ९ डिसेंबर दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास देवगड समुद्र किनाऱ्यावर ही घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची ३५ जणांची सहल देवगड येथे आली होती. त्यानंतर यातील काही विद्यार्थी हे समुद्रात आंघोळीसाठी उतरले होते. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाचजण बुडाले. यामध्ये चार मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. मृतांमध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे यांचा समावेश आहे. तर राम डिचोलकर हा मुलगा बेपत्ता आहे.४ मुलींचे मृतदेह सापडले असून एक विद्यार्थी बेपत्ता आहे. सर्व मृतदेह जवळील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here