(अहमदाबाद येथे पार पडला पदवीदान समारंभ)
SP9/ कोकरूड प्रतिनिधी
शिराळा येथील यशवंत हाॅस्पिटल व यशवंत व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्राच्या समुपदेशक सौ. साधना राजाराम पाटील यांना अहमदाबाद येथील केंब्रिज डिजिटल युनिव्हर्सिटी च्या वतीने व्यसनमुक्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉक्टरेट (phd) पदवी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. साधना पाटील ह्या गेली दहा वर्षे यशवंत व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून समाजासाठी सेवारथ आहेत.
या माध्यमातून त्यांनी सुमारे साडेतेरा हजार लोकांना व्यसनमुक्त करून अनेकांचे संसार फुलवले आहेत. दारू, तंबाखू व्यसनाच्या आहारी गेलेला माणूस सहजासहजी बाहेर पडू शकत नाही.परंतु साधना पाटील यांनी अनेक व्यसनाधीन लोकांचे समुपदेशन करून त्यांना या कचाट्यातून बाहेर काढण्याचे आदर्शवत काम करत आहेत. याचबरोबर साधना पाटील यांनी शिराळा तालुक्यातील सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या सखी मंचच्या शिराळा तालुका अध्यक्ष म्हणून सन २०१९ ते २०२३ पर्यंत चांगले काम केले आहे. यामाध्यमातून त्यांनी अनेक समाजिक, सांकृतिक, शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. साधना पाटील ह्या राबवित असलेल्या यशवंत व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्रातील कार्यात त्यांचे पती डॉ. राजाराम पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत आहे. साधना पाटील यांना मिळालेल्या डॉक्टरेट पदवी बद्दल शिराळा तालुक्यातून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.