प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर : पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा केला जातो. पुईखडी येथील ११० के व्ही सब स्टेशन टा्न्सफार्म दुरुस्तीचं काम महावितरण कंपनीकडून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार असल्यानं, सोमवार दि ११ डिसेंबर रोजी निम्म्या कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा खंडित होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मंगळवार दि १३ डिसेंबर रोजी अपुरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होईल, असं महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आल आहे.ए वॉर्ड, बी वॉर्ड अंतर्गत पाण्याचा खजिना इथली वितरण शाखा, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, मंगेशकर नगर , जरग नगर ,गंजी माळ, रामानंदनगर, सुभाष नगर पंपिंगवरील ग्रामीण भाग, पाचगाव, आर . के . नगर तसेच ई वॉर्डमधील संपूर्ण राजारामपुरी परिसर, रुईकर कॉलनी, लिशा हॉटेल, शिवाजी पार्क, फ्रेंड्स कॉलनी, शाहूपुरी व्यापार पेठ, शाहूपुरीतील १ ते ४ गल्ली, साईक्स एक्सटेन्शन, शाहूपुरी पाच बंगला परिसर या भागात सोमवारी पाणीपुरवठा होणार नसल्याची सुचना महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.