ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीस चालना द्यावी : आनंदराव माईगडे

0
66

 

SP9/ कोकरूड प्रतिनिधी 
     
विज्ञानाला अध्यामिकेची जोड दिल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी संशोधक घडतील. त्यांच्या संशोधन वृत्तीस शिक्षकांनी द्यावी 
असे प्रतिपादन दत्तसेवा संस्थेचे अध्यक्ष आनंदराव माईगडे यांनी आध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले.


 तुरूकवाडी ता. शाहूवाडी येथील ५१ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षिस वितरण व समारोप प्रसंगी
ते बोलत होते. अध्यक्षस्थानी होत्या. प्रारंभी अंधश्रध्दा निर्मूलनचे सुनिल स्वामी व त्याच्या सहका-यानी वैज्ञानिक किर्तनाद्वारे बाल वैज्ञानिक व उपस्थीतांना वैज्ञानिक प्रबोधश केले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार यानी तर स्वागत विज्ञान सचीव बाबूराव शिंदे  यांनी केले. याप्रसंगी तहसीलदार रामलिंग चव्हाण म्हणाले की, विद्यार्थयांच्या शोधक वृत्तीचा शोध शिक्षकांनी घ्यावा.याप्रसंगी  एम.आर.पाटील, यांनी मनोगते व्यक्त केली.    विस्ताराधिकारी आनंदराव सुतार,दत्तसेवा संस्थेचे सचीव डॉ. बाळासाहेब पाटील,प्रशासनाधिकारी जे.एस.पोतदार, केंद्रप्रमुख सदाशिव थोरात,कृष्णात कडू,बी.बी.कोंडावळे,शिवराम मावची, शिवाजी माळी,विज्ञान संघाचे अध्यक्ष टी.टी.सुतार,राजेंद्र मराठे याच्यासह प्राथमिक व माध्यमिक संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. यासाठी मुख्याध्यापक गणेश पाटील, बाबूराव शिंदे,केंद्रप्रमुख शिवाजी माळी,संभाजी लोहार,क्रांती माजले, अमोल साळवी,राजेंद्र कांबळे,उमेश नांगरे,दत्तसेवा संस्थेचे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी    परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संभाजी लोहार यांनी केले. उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक गणेश पाटील यांनी मानले. 
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here