लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्याचे निश्क्रीय पोलीस निरीक्षक यांना तातडीने निलंबीत करा.

0
206

प्रतिनिधी : स्नेहल घरपणकर

दोन दिवसांपूर्वी षनिवार पेठ कोल्हापूर येथे माजी आमदार क्षीरसागर व त्यांच्या टोळक्याने एका सर्वसामान्य व्यक्तीच्या घरामध्ये घुसून दहषत माजवून मारहाण केल्याचे व्हिडीओज् सर्वत्र व्हायरल झाले आहेत, त्याच कुटूंबातील एका भयभीत व्यक्तीने धाडसाने आपल्याला पोलीस प्रषासनाकडून न्याय मिळेल या आपेक्षेने लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली, परंतु नेहमी प्रमाणे चैकषी करून कारवाई करतो हे आष्वासन देऊन संबंधीतांना परत पाठवले.
राजकीय दबावाखाली जर लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काम करणार असतील आणि सर्व सामान्य नागरीकांना न्याय देण्यास असमर्थ असतील तर त्यांना ताबडतोब निलंबीत करावे. कोणी दहषत माजवली, कषासाठी मारहाण केली हे सर्व व्हिडीओच्या माध्यमातून स्पश्ट झाले आहे, तरी पण कसली चैकषी करताय? त्या कुटूंबातील लोकांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांना न्याय मिळणार काय? हे जिल्हा पोलीस प्रमुखांनी स्पश्ट करावे. 
कायद्याचे राज्य आहे हे म्हणणाÚया गृहमंत्री व मुख्यमं०यानी या गंभीर प्रकारामध्ये लक्ष घालावे व अषी कायमच दहषत माजवणाÚया प्रवृत्तीच्या माजी लोकप्रतिनीधीला दिलेले पद ताबडतोब काढून घ्यावे व या गंभीर प्रकारामध्ये दोशी असणाÚयांवर कडक कारवाई करावी अन्यथा आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल, यापूर्वी सुध्दा वरीश्ठ महिला पोलीस अधिकाÚयांच्या बाबतीत काय घडले हे सर्व महाराश्ट्राने पाहिले आहे, एका मागासवर्गीय बांधवाला याच माजी लोकप्रतिनीधीने मारहाण करताना सर्वांनी पाहिले आहे, अषा अनेक घटना घडून सुध्दा हि व्यक्ती जर मोकाट सुटणार असेल तर भविश्यात जिल्हा पोलीस प्रषासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल याची नोंद घ्यावी.यावेळी संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, विशाल देवकुळे, हर्षल सुर्वे, अवधूत साळोखे, राहुल माळी, राजेंद्र पाटील, दत्ताजी टिपूगडे, सुहास डोंगरे, दिपाली शिंदे, दिलीप देसाई, दिनेश साळोखे, अभिजीत पाटील, महेश उत्तुरे, संजय जाधव, शशिकांत बिडकर, विराज ओतारी, स्वरूप मांगले, विवेक काटकर, अभिजीत ओतारी, राजू सांगावकर,धनाजी यादव, विकी मोहिते, विनय क्षीरसागर, विजय नाईक, रुपेश रोडे, निवेदन देताना उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here