संघर्ष यात्रा पोलिस प्रशासनाने अडवली, नागपुरात मोठा गोंधळ; पोलिसांनी घेतल रोहित पवारांना ताब्यात.

0
86

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

नागपूर: रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रा आज नागपूर येथे होत संपन्न होत आहे. नागपूरच्या टेकडी परिसरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी हजेरी लावली. या सभेनंतर रोहित पवार यांनी त्यांचा मोर्चा थेट विधानभवनावर नेला.
यावेळी पोलिसांनी रोहित पवार यांची संघर्ष यात्रा अडवली आहे. रोहित पवार यांच्यासोबत आलेले कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नागपूर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत.
यावेळी रोहित पवार, रोहित पाटील यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र रोहित पवार यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला होता. त्यांना खासगी वाहनातून नेण्यात आले आहे. संघर्ष यात्रा विधानभवनावर जाणार होती. निवेदन स्विकारण्यासाठी रोहित पवार यांनी सरकारला अल्टिमेट दिला होता. मात्र सरकारकडून कोणीही निवेदन स्विकारायला आल नाही. त्यामुळे रोहित पवार आक्रमक झाले आहेत. रोहित पवार यांनी गेल्या दोन महिन्यांपासून संघर्ष यात्रा काढली आहे. युवकांचे प्रश्न, आरोग्य, शेती विषयक प्रश्नांबाबत ही यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेचा आज नागपुरात समारोप होता.

शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या पोरांवर लाठीचार्ज करत आहात. ही कसली दडपशाही आहे?, असा सवार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. सरकारला चर्चा करायला काय होत. आमदाराची ही परिस्थिती आहे तर गरीब लोकांची काय परिस्थिती असेल?,असे रोहित पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here