प्रतिनिधी- स्वप्निल गोरंबेकर
जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या बुद्धाचा धम्म डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना दिला आणि देशांमध्ये समता व शांतता नांदू लागली. याच बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार हा धम्म परिषदेच्या माध्यमातून साऱ्या जगभर केला जातो.
अशाच पद्धतीने मुंबई येथील रेस कोर्स मैदान येथे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले साहेब यांच्या आयोजनाने आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन शनिवार दि. 16 डिसेंबर 2023 रोजी केले आहे.
या धम्म परिषदेला जागतिक कीर्तीचे धम्म गुरु दलाई लामा हे मार्गदर्शन करणार असून देशातील लाखो बौद्ध बांधव व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
याच धम्म परिषदेत सहभागी होण्यासाठी कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह कसबा बावडा या ठिकाणी बैठक पार पडली.
यावेळी उत्तमदादा कांबळे म्हणाले, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्धाचा धम्म दिला म्हणून आपण माणसासारखं जगणं जगू लागलो. अशाच बुद्ध धर्माचा प्रसार सर्व बहुजन समाजापर्यंत होणे काळाची गरज आहे.
म्हणूनच नामदार रामदास आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनातून बाबासाहेबांचा बुद्ध धम्म साऱ्या जगापर्यंत पोहोचवण्यासाठीच या जागतिक धम्म परिषदेचे आयोजन केलेले आहे. या परिषदेसाठी कोल्हापुरातून हजारो कार्यकर्ते दाखल होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी राज्य सचिव मंगलराव माळगे म्हणाले, प्रज्ञा शील करुणा माणसापर्यंत नेऊन त्याला माणूसपण बनवणारा धम्म हा भविष्यकाळ टिकवण्यासाठी या धम्म परिषदेत आपण उपस्थित राहणे काळाची गरज आहे.
तर राज्य नेते बी.के. कांबळे म्हणाले, रामदास आठवले यांनी फक्त राजकीय प्रवास केला नाही तर बाबासाहेबांच्या विचारांचा धम्म सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रम आखले त्यातीलच हा धम्माचा कार्यक्रम आहे.
हा आपण यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी कोल्हापुरातून दादांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने उपस्थित राहूया. यावेळी कामगार प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बी. आर. कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष संजय जिरगे, करवीर तालुध्यक्ष बाळासाहेब वाशीकर, कागल तालुकाध्यक्ष बाबासाहेब कागलकर,शिरोळ तालुकाध्यक्ष जयपाल कांबळे,शाहुवाडी तालुकाध्यक्ष विश्वास सरूडकर, गगनबावडा तालुकाध्यक्ष तानाजी कांबळे, हातकणंगले तालुकाध्यक्ष अविनाश अंबपकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ, जिल्हा संघटक राजेंद्र ठीकपुर्लीकर, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कांबळे, कामगार आघाडी शहराध्यक्ष प्रदीप मस्के, गौतम कांबळे, संजय कोळी,अतुल सडोलीकर, राहुल कांबळे, जयवंत हळदीकर, चंद्रशेखर कोरे, सचिन मोहिते, प्रज्योत सूर्यवंशी आदी. कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळीकर यांनी केले. तर आभार आण्णासो आवळे यांनी मानले.