म्हाकवे – ता. कागल येथील 24 वर्षीय हर्षद महिपती पाटील या युवकाची चालता बोलताच झालेली एक्झिट चटका लावणारी ठरली. प्रत्येकांशी हसतमुख असणाऱ्या एकुलत्या हर्षदच्या मृत्यूची बातमी गावात वार्यासारखी पसरली अन् गावकरी शोकसागरात बुडाले.
12वी नंतर इलेक्ट्रिशन झालेला हर्षद सकाळी नेहमीप्रमाणे मिञांसोबत जनावरांना वाडे आणण्यासाठी गेला होता. वाडे मोटरसायकलवर बांधून तो घरी परतत होता.
यावेळी रस्त्यात बैलगाडीत ऊस भरले जात होते. त्यामुळे सर्वच मिञ आप आपल्या मोटरसायकली बंद करून मोटरसायकलीवरच बसून एकमेकांशी बोलत चेष्टा करत बैलगाडी बाहेर जाण्याची वाट पाहत होते.
यावेळी अचानक हर्षदला चक्कर आल्याचे निमित्त झाले. तो मोटर सायकल सोडून दुसऱ्या बाजूला कोसळला. सोबत असणाऱ्या मिञांनी त्याला तात्काळ दवाखान्यात दाखल केले. परंतु, त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई वडील बहीण असा परिवार आहे.
मिञांच्या डोळ्यादेखतच घटना..
डोळ्यादेखतच घडलेल्या घटनेने मिञही हबकले आज सोशल मीडियावर त्याच्याच श्रध्दांजलीचे फोटो दिसत होते.