रॅगिंग प्रतिबंधनात्मक समितीची बैठक खेळीमेळीत संपन्न…महाराष्ट्र शासन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय

0
319

महाराष्ट्र शासन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांच्यावतीने रॅगिंग प्रतिबंधात्मक समितीचे बैठक बोलवण्यात आली होती.रॅगिंग व गैरवर्तन याबाबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.प्रति वर्षाप्रमाणे प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व विद्यार्थ्यांच्या तोंडी तक्रारीनुसार गस्त पथकाची नेमणूक करून गैरवर्तनास प्रतिबंध करणे.आत्तापर्यंत विद्यार्थ्यांनी केलेले गैरवर्तन व त्यावर करण्यात आलेली उपायोजना त्याचबरोबर कुल मंत्री उपकुल मंत्री स्थानिक पालक यांचे विद्यार्थ्यांना वेळोवेळी होणारे मार्गदर्शन अशा अनेक उपाययोजनांच्या वर चर्चा आज दिनांक १३/ 12 /2023 रोजी रॅगिंग प्रतिबंधात्मक समितीच्या बैठकीमध्ये या सर्व विषयावर चर्चा करण्यात आली.

त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व शेतकरी वर्गांना कृषी विषयक मार्गदर्शन सदर अंतर्गत नवनवीन उपायोजना या विषयावर ही चर्चा करण्यात आली.समितीचे कामकाज विद्यापीठ अनुदान आयोगाच्या उच्च स्तर शिक्षण संस्था मधील रॅगिंग प्रतिबंधात्मक उपायोजना अधिनियम 2009 मधील तरतुदी व आवश्यकता नियमाचे पालन करणे याकरणे याकरणे यासंदर्भात ही या बैठकीमध्ये मुद्दा मांडण्यात आला.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या उच्च स्तर शिक्षण संस्था मधील रॅगिंग प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिनियम 2009 मधील क्रमांक 6.3 नुसार राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे शैक्षणिक वर्ष 2023 24 करिता खालील प्रमाणे रॅगिंग प्रतिबंधक समिती गठीत करण्यात आली आहे.

यामध्ये संस्थाप्रमुख म्हणून डॉक्टर सा.भा. खरबडे सहयोगी अधिष्ठाता कमिटीचे अध्यक्ष तसेच स्थानिक प्रतिनिधी म्हणून स्वप्नील रावडे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी करवीर जिल्हा कोल्हापूर, त्याचबरोबर पोलीस प्रशासन प्रतिनिधी म्हणून अनिल तनपुरे पोलीस निरीक्षक राजारामपुरी पोलीस स्टेशन, स्थानिक वृत्तपत्र प्रतिनिधी म्हणून संदीप आडनाइक दैनिक लोकमत, त्याचबरोबर सागर पाटील मॅनेजिंग डायरेक्टर एसपी नाईन सागर पाटील मॅनेजिंग डायरेक्टर SP-9 मराठी टीव्हीी चॅनल कोल्हापूर.सामाजिक कार्यकर्त्या सौ तनुजा शिपुरकर सचिव महिला दक्षता समिती, उपाध्यक्ष विद्यार्थी परिषद डॉ शै. शं.कांबळे सहयोगी प्राध्यापक व तथा समन्वयक, विद्या शाखा प्रतिनिधी डॉ. ज्ञा.दे.पतंगे सहयोगी प्राध्यापक व तथा समन्वयक, विद्यार्थी कल्याण अधिकारी इंजिनिअर अ. भा. देशपांडे सहाय्यक प्राध्यापक, कुल मंत्री डॉक्टर स.सा. धुमाळ सहयोगी प्राध्यापक, पालक प्रतिनिधी श्री राऊसो पाटील पालक, पाल्य कुमारी श्रुतिका राऊसो पाटील, चालू शैक्षणिक वर्षात नव्याने प्रविष्ट विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी गायत्री राजेंद्र ढगे, मयूर सचिन कुमावत, ज्येष्ठ विद्यार्थी प्रतिनिधी नंदना पी एम, अनिकेत जालिंदर जाधव, शिक्षकेतर प्रतिनिधी उ.वि. दाताडे सहाय्यक कुलसचिव या सर्वांची कमिटीवर निवड करण्यात आली आहे.विद्यापीठामधील रॅगिंग आणि गैरवर्तन प्रकाराची घटना निदर्शनास आल्यास त्यावर प्रचलित नियमानुसार कार्यवाही करण्यासाठी आणि अशा प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या हेतूने गठीत केलेली ही कमिटी आहे.
या रॅगिंग प्रतिबंधात्मक समितीच्या बैठकीवेळी प्रथम प्रास्ताविक उ .वि. दाताडे सहाय्यक कुलसचिव यांनी मांडले.मान्यवर समिती सदस्यांचे स्वागत सहयोगी अधिष्ठाता यांनी केले.अध्यक्षीय भाषण व मार्गदर्शन सहयोगी अधिष्ठा यांनी केले.या बैठकीचा समारोप व आभार प्रदर्शन अ .जा. पार्लेकर वरिष्ठ लिपिक यांनी केले.
आणि ही रॅगिंग प्रतिबंधात्मक समितीची बैठक खेळीमेळीत संपन्न झाली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here