आधार कार्डबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय, ‘या’ तारखेपर्यंत फुकटात करता येणार बदल

0
195

    Update Aadhaar free : सरकारने आधार कार्डबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता ज्यांना आधार कार्डमध्ये मोफत बदल करायचे आहेत त्यांच्यासाठी एका ठराविक तारखेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. UIDAI ने My Aadhaar पोर्टलद्वारे आधार तपशील मोफत अपडेट करण्याची मुदत वाढवली आहे.

    UIDAI ने ११ डिसेंबर २०२३ ला याबाबतची माहिती दिली. त्यानुसार आता १४ मार्चपर्यंत लोकांना आपल्या आधारमधील माहिती फुकटात अपडेट करता येणार आहे.

    वाढ करण्याचा निर्णय का?

    UIDAI ने दिलेल्या या सुविधेबाबत सामान्य लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, त्या आधारावर ही सुविधा आणखी 3 महिने म्हणजे १५ डिसेंबर ते पुढील वर्षी १४ मार्चपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    या निर्णयानंतर, myAadhaar पोर्टल https://myadhaar.uidai.gov.in/ द्वारे डॉक्युमेंट अपडेट करण्याची सुविधा १४ मार्चपर्यंत विनामूल्य राहील. महत्त्वाची बाब म्हणजे, मोफत सुविधा फक्त ऑनलाइन अपडेटसाठी उपलब्ध आहे.

    कागदपत्रे अपडेट करण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष आधार केंद्रांवर गेल्यास, तुम्हाला २५ रुपये शुल्क भरावे लागेल. ऑनलाइन मात्र ही सेवा मोफत आहे.

    आधार डेटा अपडेट का ठेवावा?

    UIDAI त्या लोकांना त्यांचे आधार अपडेट करण्याचा सल्ला देत आहे, ज्यांनी गेल्या १० वर्षांत असे केले नाही. आधारशी संबंधित फसवणुकीला आळा घालण्यासाठी हे केले जात आहे.

    UIDAI ने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे की लोकसंख्याशास्त्रीय माहितीच्या सतत अचूकतेसाठी कृपया तुमचे आधार अपडेट करा. ऑनलाइन अपडेट करता येणाऱ्या माहितीमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, फोन नंबर आणि ईमेल आयडी यांचा समावेश आहे. फोटो, रेटिना किंवा इतर बायोमेट्रिक माहिती देखील अपडेट केली जाऊ शकते. यासाठी तुम्हाला आधार केंद्रात प्रत्यक्ष जावे लागेल.

    आधार अपडेटसाठी myAadhaar वेबसाइट कशी वापरायची?

    • सर्व प्रथम https://myaadhaar.uidai.gov.in/ वर जा.
    • तुमचा आधार क्रमांक किंवा नावनोंदणी आयडी वापरून लॉगिन करा आणि नंतर ‘अपडेट नाव/लिंग/डीओबी आणि पत्ता’ बटण निवडा आणि क्लिक करा.
    • आता ‘अपडेट आधार ऑनलाइन’ बटणावर क्लिक करा.
    • पर्याय सूचीमधून ‘पत्ता’ किंवा नाव किंवा लिंग निवडा आणि नंतर ‘आधार अपडेट करण्यासाठी पुढे जा’ बटणावर क्लिक करा.
    • आता पत्ता अपडेटच्या बाबतीत, एखाद्या व्यक्तीला अॅड्रेस प्रूफ सारख्या अपडेट केलेल्या पुराव्याची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल.
    • यामध्ये कोणतेही पेमेंट समाविष्ट नाही, परंतु 14 मार्च 2024 नंतर या अपडेटसाठी 25 रुपयांचे पेमेंट ऑनलाइन घेतले जाईल.
    • यानंतर एक नवीन वेबपेज उघडेल आणि त्यावर ‘सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर (SRN)’ असेल. भविष्यातील संदर्भासाठी ते तुमच्याकडे ठेवा.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here