१३ डिसेंबर भारतीय संसदेवर दहशतवादी हल्ला

0
84

इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. इतिहासात घडलेल्या काही घटनांचे पडसाद भविष्यावरही दिसून येते. इतिहासातील काही घटना या दु:खद घटना म्हणूनही कायम कोरल्या जातात.

१३ डिसेंबर २००१ हा भारताच्या इतिहासातील काळा दिवस आहे. आजच्या दिवशी संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्याचा बिमोड करताना काही सुरक्षा रक्षकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.

जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तोयबाच्या पाच पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. या हल्ल्याने जगभरात खळबळ उडाली. १३ डिसेंबर २००१ रोजी, गृह मंत्रालय आणि संसदेचे लेबल असलेल्या कार मधून पाच अतिरेक्यांनी संसदेच्या सभागृहात प्रवेश केला.

या हल्ल्याच्या आधी राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. त्यावेळी संसदेत अनेक खासदारांसह गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी आणि इतर मंत्री अधिकारी संसदेच्या इमारती मध्ये होते.

प्रमुख राजकारण्यांसह १०० हून अधिक लोक त्यावेळी संसद भवनात होते. बंदूकधार्‍यांनी कारवर बनावट ओळख स्टिकर वापरला आणि अशा प्रकारे संसद भवनाच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था भंग केली.

 दहशतवाद्यांनी अचानकपणे गोळीबार सुरू केला. त्याच्या प्रत्युत्तरात सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दिल्ली पोलीस कर्मचारी, संसद सुरक्षा कर्मचारी आणि संसद भवन परिसरातील माळी इतर एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. 

हल्ल्यानंतर अनेक संशयितांना अटक करण्यात आली आणि डिसेंबर २००२ मध्ये जैश-ए-मोहम्मदच्या चार सदस्यांना हल्ल्यातील भूमिकांसाठी दोषी ठरवण्यात आले. २००३ मध्ये, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) ने जैश-ए-मोहम्मदचा कमांडर-इन-चीफ आणि हल्ल्याचा मास्टरमाईंड, श्रीनगर, जम्मू आणि काश्मीरच्या नूर बाग शेजारील गाझी बाबा याला ठार केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here