राधानगरी एसटी आगाराच्या अनियमित गाड्या प्रवाशांचे हाल..

0
84

राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे
कोल्हापूर-रंकाळा बसस्थानकातून राधानगरीकडे धावण्याऱ्या एस.टी. बसेस वेळेत सोडल्या जात नाहीत. रंकाळा स्थानकावरून संध्याकाळी ५:३० वाजता मुंबई-राधानगरी ही बस सुटल्यानंतर एक तास भोगावतीमार्गे राधानगरीला बस नाही. यामुळे कोल्हापूरहून राधानगरीला येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.राधानगरीहून सकाळी ११ नंतर कोल्हापूरकडे जाण्यास वेळेत बसेस नाहीत. कोकणातून येणाऱ्या बसेसही वेळत नाहीत. बस वेळेवर आली तरी बसायला जागा मिळेल की नाही, याची शाश्वती नाही. कोकणातून येणाऱ्या बस विनाथांबा असल्याने या मार्गावरील इतर प्रवाशाना एक-दोन तास बस स्थानकावरच ताटकळत बसावे लागते. , तसेच राधानगरी आगारातून बरेच वर्षाची राधानगरी पणजी ही सकाळी नऊ पंचेचाळीस वाजता तर राधानगरी पुणे सकाळी 6:45 मिनिटांनी या दोन बसेस उत्पन्न आणून देणारे बसेस अचानक बंद केले आहेत


यासंबंधात प्रवाशांनी आगार व्यवस्थापनाकडे तक्रार केली, निवेदनही दिले, तरीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय.


शालेय सहली असल्याने बसेस अपुऱ्या पडत आहेत. कोल्हापूरहून निघणाऱ्या बसेस काही वेळा ट्रॅफिकअभावी वेळेत येत नाहीत. यामध्ये सुधारणा करण्यासाठी आपला प्रयत्न सुरू असल्याचं आगार व्यवस्थापक उत्तम पाटील यांनी सांगितलं.राधानगरी आगारामध्ये २०१९ मध्ये ६१ एसटी बसेस उपलब्ध होत्या सध्या आगारामध्ये ४२ इतक्याच एसटी बसेस आहेत.प्रवाशी संख्या वाढली एसटी संख्या कमी झालीय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here