कौलव गावचे सुपुत्र विश्वास सोनाळकर यांना गोवा विद्यापीठ ची पीएचडी

0
63

राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे

राधानगरी तालुक्यातील कौलव गावचे सुपुत्र आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथील प्राध्यापक विश्वास पांडुरंग सोनाळकर यांना गणित विषयांमधील “विभेदक समीकरणांची स्थिरता” या विषयांमध्ये गोवा विद्यापीठाची डॉक्टरेट (पीएच. डी.) पदवी प्राप्त झाली.

त्यांना गोवा विद्यापीठातील गणित विभागातील डॉ. ए . एन . मोहपात्रा, डॉ. वाय. एस. वालावलीकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्यांना गोवा विद्यापीठातील डॉ. एम. कुंदनन, प्रोफेसर आर. एस. गाड, डॉ. एम. तांबा यांचे सहकार्य मिळाले.

तसेच त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हीज हायनेस खेमसावंत भोंसले, चेअरमन हर हायनेस शुभदादेवी भोंसले, कार्यकारी विश्वस्त हीज हायनेस लखमराजे भोंसले, तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांचेही सहकार्य मिळाले.

डॉक्टर विश्वास सोनाळकर यांचे महाविद्यालयीन शिक्षण भोगावती महाविद्यालय कुरुकली येथे झालेले असून त्यांनी तेथे तासिका तत्त्वावर काही वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलेले आहे. ते विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून परिचित आहेत. त्यांच्या दोन विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प विद्यापीठ स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here