दिघीत माथेफिरूकडून दुचाकी चारचाकी वाहनांची तोडफोड, दोघांआरोपी विरोधात गुन्हा दाखल !!!

0
142

प्रतिनिधी : मेघा पाटील

पुणे – पुण्यातील गायकवाडनगर,दिघी येथे दोन अनोळखी माथेफिरूंनी दुचाकी व चारचाकी वाहनांवर बेफाम दगडफेक करत तोडफोड केल्याचा प्रकार मंगळवारी पहाटे घडला. याप्रकरणी दिघी पोलिसांनी दोन अनोळखी आरोपींनी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार 12 डिसेंबर रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास गायकवाड नगर येथील अशा धन सोसायटी जवळ पार्क केलेल्या गाड्यांवर दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी दगडफेक करून वाहनांचे नुकसान केले.

यामध्ये मारुती स्विफ्ट,बजाज ऑटो रिक्षा, मारुती सुझुकी इको, टाटा मॅजिक स्कूल व्हॅन, स्विफ्ट डिझायर या वाहनांसह चार दुचाकीवर बेफाम दगडफेक करून त्यांचे नुकसान केले. घटनास्थळी पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, साहेब पोलीस आयुक्त विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित, गुन्हे निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी भेटी देऊन तपासाच्या सूचना दिल्या. वाहनांची तोडफोड करणाऱ्या फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here