बॉलिवूडचा खिलाडी कुमार त्याच्या आगामी ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. 

0
65

बॉलिवूडचा खिलाडी कुमार त्याच्या आगामी ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. २००७ साली प्रदर्शित झालेल्या वेलकम या सिनेमाचा हा तिसरा भाग आहे. वेलकम आणि वेलकम बॅक या चित्रपटांनंतर प्रेक्षकांना ‘वेलकम ३’ची प्रतीक्षा होती.

आता अखेर या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. अक्षयने शूटिंगदरम्यानचा एक मजेशीर व्हिडिओ शेअर करत सिनेमाबाबत मोठी अपडेट दिली आहे.

ऑगस्ट महिन्यात ‘वेलकम ३’ची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर सिनेमाचं पोस्टर आणि टीझरही प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामुळे या सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली होती.

पुढच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाच्या शूटिंगला आता सुरुवात झाली आहे. अक्षय कुमारने ‘वेलकम ३’च्या सेटवरील एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अर्शद वारसी आणि अक्षय कुमार सिनेमातील एक सीन शूट करत असल्याचं दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here