नॉन-कन्वेंशनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वूमेन, कोल्हापूर यांच्या वतीने ग्रंथालयात शनिवार, 12 ऑगस्ट रोजी ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला.

0
175

सायबर ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ नॉन-कन्वेंशनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वूमेन, कोल्हापूर ग्रंथपाल दिन साजरा: कै.डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त, सायबर ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ नॉन-कन्वेंशनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वूमेन, कोल्हापूर यांच्या वतीने ग्रंथालयात शनिवार, 12 ऑगस्ट रोजी ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. ग्रंथपाल अनुराधा कुंभार यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाची थोडक्यात माहिती दिली. छायाचित्राचे पूजन प्राचार्य डॉ. ए आर कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व विभागप्रमुख, अध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी यांनी कै. डॉ. एस. आर. रंगनाथन यांना पुष्पांजली वाहिली. रंगनाथन यांनी ग्रंथालय कार्यप्रक्रियेसाठी केलेल्या कार्याची माहिती घेणे हा ग्रंथपाल दिन साजरा करण्याचा उद्देश होता. प्राचार्यानी ग्रंथालयातील उपलब्ध साहित्य वाचनाचा उपयोग व फायदे याविषयी भाषण केले. मृणालिनी शिंगे यांनी आभार मानले. संस्थेचे सेक्रेटरी व मॅनेजिंग ट्रस्टी डॉ.आर. ए. शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here