प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील गवसे येथील आजरा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या रविवार दि १७( डिसेंबर) रोजी मतदान होत असून कारखान्यासाठी प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील याच्या सह स्थानिक आघाडीच्या नेत्यांनी आघाडी केली असून प्रचारादरम्यान दोन्ही बड्या नेत्यांनी मात्र एकमेकांच्यावर टिका टिप्पणी टाळली आहे.त्यामुळे मतदान हे अंडरकंरट पध्दतीनेच होणार असल्याचे दिसून येते आहे. कारखाना निवडणूकीसाठीच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. कारखाना निवडणुकीसाठी ३२७८४ सभासद मतदार आहेत.