गॅस गळतीमुळे आग, कल्याणमधील मनसे महिला शहराध्यक्षा जखमी

0
131

कल्याण – घरगुती गॅसच्या गळतीमुळे लागलेल्या आगीत मनसे शहर अध्यक्षा शीतल विखणकर या गंभीर जखमी झाल्याची घटनाकाल सायंकाळच्या सुमारास घडली.

शीतल विखणकर या कल्याण खडकपाडा परिसरातील कल्पेश अपार्टमेंटमध्ये राहतात.

काल सायंकाळी त्या जेवण बनवत असताना अचानक गॅस बंद झाला . गॅस बंद झाल्याने त्यांनी पुन्हा लायटरने गॅस सुरू करण्याचा प्रयत्न करताच आगीचा भडका उडाला. या आगीत शीतल विखणकर गंभीर जखमी झाल्या .

दरम्यान घरात कुटुंबीय होते त्यांनी तत्काळ आग विझवून शीतल यांना उपचारासाठी ऐरोली रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here