बसचालकाने वाचविण्याचा प्रयत्न करूनही बसवर दुचाकी आदळली; दोघेजण जखमी

0
89

वलांडी (लातूर ) : येथून जवळ असलेल्या उदगीर-निलंगा राज्य मार्गावर शनिवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास उदगीरहून निलंग्याकडे जाणाऱ्या एसटी बसला दुचाकीस्वाराने धडक दिल्याची घटना घडली.

यामध्ये दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी सांगितले, गौसोद्दीन गफूरसाब बागवान (वय ५५ रा. साकोळ ता. शिरुर अनंतपाळ) व शबाना बेगम गौसौद्दीन हे साकोळहून वलांडीमार्गे दुचाकी क्रमांक एमएच २४ एक्स २६ ६४ ने देवणीकडे जात होते.

पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल टाकून पुढे जात असताना पंपाच्या दोन्ही बाजूला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉल्या थांबल्याने समोरून येणाऱ्या एसटीचा त्यांना अंदाज आला नाही. यावेळी दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी बसचालकाने रोडच्या कडेला बस ( क्रमांक एमएच २०. १४९९ ) घेऊनही दुचाकी एसटीवर आदळली.

यात गौसोद्दिन बागवान यांना डोक्याला व पायाला दुखापत झाली. जखमे वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. काळे, पोहेकाॅ लामतुरे यांनी दिली. बसमध्ये उदगीर, देवणी येथून बसलेले ३१ प्रवासी व वलांडी येथून बसलेले १२ प्रवासी होते. बसमधील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसल्याचे वाहक भोसले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here