Kolhapur: यड्रावच्या ग्रामसभेत अध्यक्षपदावरून वादावादी, अखेर ग्रामसभा रद्द

0
58

यड्राव : ग्रामसभा अध्यक्ष निवडीवरून झालेली वादावादी, ग्रामसेवकाने सांगितलेला नियम, सभा त्याग केलेले सत्ताधारी गट तर कोरम असूनही सभा पुढे घेण्यासाठी ग्रामसेवकांपुढे आग्रही असलेले ग्रामस्थ.

तर माजी सरपंच व उपसरपंच यांनी समन्वयाची भूमिका घेतल्याने अखेर ग्रामसभा रद्द करण्यात आली. यामुळे परस्पर विरोधी घोषणा दिल्याने वातावरण तणावपूर्ण निर्माण झाले होते.

ग्रामपंचायत सभागृहात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी ग्रामसभा व्हिडिओ रेकॉर्डिंग करूनच घेण्यासाठी प्रशासनास धारेवर धरले.

ग्रामसेवक उमेश रेळेकर यांनी सभेचे अध्यक्षपद सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वीकारावे अशी सुचविले. त्याला ग्रामस्थांनी विरोध दर्शवून ग्रामस्थातून सभा अध्यक्ष निवडावा अशी मागणी जोर लावून धरल्याने गोंधळ सुरु झाला.

ग्रामसेवकांनी सभेचा अध्यक्ष पदसिद्ध सरपंचच असतो त्यामुळे तो निवडता येणार नाही असे सांगितल्यावर ग्रामस्थ संतप्त झाले.

विरोधी गट ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून सरपंचांसह सत्ताधारी गट यानी सभेतून निघून जाताना सभा रद्द केल्याची घोषणा सरपंच यांनी केली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी याची साम्राज्य केली आहे असे सांगितले.

तर ग्रामस्थांनी या सभेसाठी कोरम पूर्ण असल्याने ही सभा झालीच पाहिजे यासाठी ग्रामसेवक उमेश शिराळकर यांना घेराव घातला. सभा रद्द झाल्याचे लेखी पत्र ग्रामसेवकाकडून मिळाल्यानंतर माजी सरपंच सरदार सुतार व माजी उपसरपंच विजय पाटील यांनी व ग्रामस्थांनी सभागृह सोडले

काही लोकांनी गोंधळ घातला. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आम्ही सभा त्याग केला. गटविकास अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन पुढील ग्रामसभा घेवू – कुणालसिंह नाईक निंबाळकर, सरपंच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here