प्रतिनिधी: स्नेहल घरपणकर
कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचाराचा वारसा जपणारे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आमदार जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष, व्ही बी पाटील जिल्हाध्यक्ष,आर के पवार शहराध्यक्ष यांच्या मार्गदर्शना नुसार व मान्यतेने कोल्हापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या शहर सचिव पदी ज्योतीराम रमेश शिंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ते करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.
आत्तापर्यंत प्रामाणिक केलेल्या कामाची पोच पावतीच म्हणावी लागेल. नागेश जालिंदर फराडे अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग कोल्हापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे मार्गदर्शन लाभले.