नमस्ते नाशिक फौंडेशनचा आणखी एक स्तुत्य उपक्रम. ३६६ गरजू विद्यार्थ्यांना मोफत स्वेटर वाटप.

0
63

प्रतिनिधी : प्राध्यापिका मेघा पाटील

नाशिक, दिनांक १७ डिसेंबर :- “जिथे कमी तिथे आम्ही” या युक्तीवर चालणाऱ्या नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक ही संस्था नेहमी समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात पुढे असते.नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांच्याकडून कै.शालिनीताई बिडकर प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, वारे येथे ३६६ गरजू विद्यार्थ्यांना मोफत स्वेटर वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या स्नेहल देव, प्रमुख अतिथी म्हणून बार कौन्सिल ऑफ नासिक तथा मा.वी.प्र. चे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, कर्नल मच्छिंद्र शिरसाट, तहसीलदार पंकज पवार ,नमस्ते नाशिक फाउंडेशनचे खजिनदार संदीप देव, सीए मयूर कोठावदे,सुनील कोटकी, नीता मालपुरे, तलाठी महेश भोये, समृद्धी महाजन, समीर मालपुरे,नीता शेवाळे, जनार्दन गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्नेहल देव या नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमी विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात. याच अनुषंगाने हिवाळ्यात स्वेटर वाटपाचा कार्यक्रम शनिवारी दिनांक १६.१२.२०२३रोजी वारे तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे पार पडला. यावेळी ३६६ विद्यार्थ्यांना मोफत स्वेटर वाटप करण्यात आले.
यावेळी मविप्र चे सरचिटणीस नितीन ठाकरे म्हणाले की नमस्ते नाशिक फाउंडेशन,नाशिक ही संस्था नेहमी असे चांगले समज उपयोगी उपक्रम राबवत असते. अशाच उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी होऊन हातभार लावण्याची गरज आहे असे ते म्हणाले आणि संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राठोड यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here