शिराळा तालुक्यातील वंचित तसेच पाटण कराड-दक्षिण भागाला आधी आमचे हक्काचे पाणी दया ,मगच पाणी वळवायचे बोला : डॉ भारत पाटणकर

0
103


SP9 / कोकरूड प्रतिनिधी

शिराळा तालुक्यातील वंचित भाग तसेच पाटण कराड -दक्षिण वंचित भागाला आधी आमचे हक्काचे पाणी दया ,मगच पाणी वळवायचे बोला.असा परखड इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष ,पाणी संघर्ष चळवळीचे नेते डॉ.भारत पाटणकर यांनी पणुंब्रे वारुण ता. शिराळा येथील शेतकरी कार्यकर्ते बैठकीत बोलताना दिला.यावेळी शिराळाचे माजी सभापती हणमंतराव पाटील श्र.मु.द.राज्य सदस्य वसंत पाटील.सरपंच दगडू पाटील आबासो शेवाळे, उदय पाटील ,मोहन पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

डॉ.पाटणकर म्हणाले.शेतीला पाणी नसल्यामुळे या विभागातील लोक हमालीसाठी मुंबईला जातात.त्यांचे हक्काचे पाणी आधी शेताचे बांधापर्यंत दया मगच इतरत्र पाण्याचे नियोजन करा.इथले बोलत नाही तर इतराना पाणी देताना साडेतीन टी एम सी देताना कुणाला विचारुन दिले आणि आता दोन टी एम सी सांगलीला मागता ते देणार नाही .वेळ प्रसंगी सरकारलाही आम्ही हादरवून सोडू.असा सडेतोड इशारा दिला .०ते २६ कि. मी.तील शेताच्या बांधापर्यंत सूक्ष्म सिंचनला २०१६ला मंजुरी असताना कृष्णा खोरेने ते त्वरित पूर्ण करावे.मुख्य कालव्यावरील उर्वरीत उपसा सिंचन योजना कार्यान्वीत कराव्या असे शेवटी बोलताना सांगीतले.

माजी सभापती हणमंतराव पाटील हा लढा या विभागातील शेतकर्यांचा आहे.आम्ही तो वंचित भागाला हक्काचे पाणी मिळेपर्यंत लढत राहू.आपण सर्वजण यापुढे अधिक ताकदीने लढूया.श्र.मु .द.चे सदस्य वसंत पाटील म्हणाले ज्यानी धरणा साठी त्याग त्याचे ३२वर्ष पुनर्वसनाचे प्रश्न रखडले.त्याना निधी नाही.मुख्य कालव्याला जमिनी दिल्या त्यांच्या जमिनीला पाणी नाही.धरण जवळ असून वंचित गावे याना पिण्यासाठी आणि शेती साठी पाणी नाही ते आधी पूर्ण करा मगच पाण्याचे बोला.आता या विभागातील शेतकरी शांत बसणार नाही डॉ.पाटणकर याचे नेतृत्वा तीव्र लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी आरळ्याचे माजी सरपंच हिंदूराव नांगरे. काळद्रे सरपंच विजय पाटील आनंदराव पाटील, चरण शंकर नायकवडी ,सर्जेराव मस्कर,मिलिंद धर्माधीकारी, मांगलेचे राजू दसवंत,संजय दसवंत,करमाळे सचिन पाटील पाचगणी संदीप मणदूर शिवाजी पाटील,सखाराम पाटील.वाकुर्दे वसंत शेटके गणपती पाटील गुढे.आबासो शेवाळे येवती मानसिंग पाटील ,पनुम्ब्रे शंकर बोरगे वाकाईवाडी आदी ठिकाणाहून शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here