प्रतिनिधी: पन्हाळा
कोलोली येथील श्री गाडाई देवीची यात्रा म्हणजेच धाकटी दिवाळी मोठ्या उत्सहात साजरी झाली. पाळणे, झोकाळे, विविध खाद्य पदार्थाचा आस्वाद घेत गाडाई चौक तीन दिवस गजबजून गेला होता….
पन्हाळा तालुक्यातील कोलोली गावची श्री गाडाई देवीची यात्रा म्हणजेच धाकटी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, ग्रामपंचायतीच्या पद्धतशीर नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, बुधवार ते शनिवार पर्यत गावामध्ये मोठ्या गर्दीत यात्रा संपन्न झाली.माहेरवाशीण व पैपाहुणे यांनी मंदिराचा परिसर चांगला गजबजला होता,पहाटे देवीला अभिषेक व आरती सोहळा गावचे सुपुत्र व अंधेरी पश्चिमचे कांँग्रेसचे आमदार
अशोकराव जाधव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चे निकटवर्तीय व गावचे पुत्र मुंबई विधानसभेचे समन्वयक सुभाष मेंगाने, विजय मेंगाने. माजी सरपंच विकास पाटील, तसेच मुंबई शिवाजी पार्क पोलिस ठाण्याचे सह. पोलिस निरिक्षक अभिजीत जाधव व मयुरा जाधव, करवीर नायब तहसिलदार विजय जाधव, सरपंच पवित्रा कांबळे, उपसरपंच पी. आर. पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आरती सोहळा संपन्न झाला.
लहान बालचमूनी झोकाळे, पाळणे, मिकीमॉस, रेल्वेगाडी आदी खेळण्यांचा आनंद लुटत आइस्क्रीम व बेलवर ताव मारला.तर रात्री मंदीरा भोवती बैलाचा गाडा,तमाशा, दुस-या दिवशी जंगी कुस्त्याचे मैदान, व तिस-या दिवशी महीलांचे मनोरंजन म्हणून आँरकेस्ट्रा चे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचातीच्या नियोजनबद्ध केलेल्या कामाचे पैपाहूणे व ग्रामस्थामधून आभार होत आहे….