प्रतिनिधी: प्राध्यापिका मेघा पाटील
कोल्हापूर : राज्यपाल रमेश बैस यांचा सोमवारचा (१८ डिसेंबर २०२३) कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
शिवाजी विद्यापीठाच्या ६० व्या दीक्षांत समारंभासाठी राज्यपाल बैस उपस्थित राहणार होते. याशिवाय त्यांच्या उपस्थितीमध्ये कंदलगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रा व महाशिबिराचे आयोजन केले होते. दरम्यान राज्यपाल कार्यालयाकडून सोमवारी सकाळी, जिल्हा प्रशासनाला रमेश बैस यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा रद्द झाल्याचे कळविले. दरम्यान कंदलगाव येथील विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम व महाशिबिर कार्यक्रम नियोजित वेळापत्रकानुसार जिल्हाधिकारी राहुल रेखावार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.