प्रतिनिधी: प्राध्यापिका मेघा पाटील
महावीर महाविद्यालयातील एन.सी.सी. छात्र कृष्णदेव नामदेव गिरी (12 वी विज्ञान) यांची 26 जानेवारी 2024 प्रजासत्ताक दिन परेड साठी अंतिम निवड झाली. जुलै 2023 पासून कोल्हापूर मध्ये चार व पुणे या ठिकाणी सहा अश्या एकूण 10 शिबिरामध्ये अत्यंत खडतर निवड प्रक्रियेतून कॅडेट कृष्णदेव यांची निवड झाली.
विशेष बाब म्हणजे त्याचे पालक श्री नामदेव गिरी (शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष, कोल्हापूर ) हे आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.
RDC परेड मध्ये निवड होणे ही एन.सी.सी.मधील सर्वात गौरवाची व अभिमानाची बाब असते,साधारणता महाविद्यालयातील एका कॅडेट ची निवड झाली तर पुढील कॅडेट ची निवड होण्यासाठी किमान सहा-सात वर्षाचा कालावधी जात असतो.मात्र महावीर महाविद्यालयातील एन.सी.सी.विभागातील छात्र आपल्या जिद्द व कष्टाच्या जोरावर 2021,2023,2024 असे सलग निवडले गेले यामधे संस्था व महाविद्यालयाचा मोठा गौरव आहे.
कॅडेट कृष्णदेव ला संस्थेचे चेअरमन ॲड. के. ए. कापसे साहेब, सचिव मोहन गरगटे साहेब , प्राचार्य डॉ आर. पी.लोखंडे , प्रा.राहुल आडके यांची प्रेरणा मिळाली तसेच कर्नल एम. मूथांना, कर्नल निलेश पाथडकर, कॅप्टन उमेश वांगदरे, लेफ्टनंट डॉ सुजाता पाटील, सुभेदार मेजर शिव बालक, पी आय स्टाफ, डि के राव यांचे मार्गदर्शन लाभले.