Sp9/ कोकरूड प्रतापराव शिंदे
तणावमुक्त जीवणासाठी नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे असे प्रतिपादन शिल्पकार एज्युकेशन सिस्टीमचे संस्थापक सोपान शेडगे यांनी केले.
ते कोकरुड ता. शिराळा येथे डॉ. एस. एन. पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित ‘तयारी जिंकण्याची’ या विषयावर कार्यशाळेत बोलत होते.
प्रारंभी सरस्वती पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थापक डॉ.एस.एन.पाटील, चेअरमन उषाताई पाटील, संचालक डॉ. पंकज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना शेडगे पुढे म्हणाले की, क्षेत्र कोणतेही असो आजच्या स्पधेॅच्या युगात स्मार्ट वर्क केले पाहिजे. पतसंस्थेच्या कार्यालयीन व्यवस्थापन नियोजनबद्ध असले पाहिजे.
लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. टीम वर्कने काम केल्यावर कमी वेळात अधिक यश मिळते. याप्रसंगी व्याख्याते सोपान शेडगे यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
3 या कार्यक्रमास डॉ. एस. एन.पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे जनरल मॅनेजर तानाजी बामणे, कर्जमंजुरी अधिकारी सुमंत माळी, प्रशासकीय अधिकारी संजय पाटील, कर्जवसुली अधिकारी युवराज माईंड आदींसह सर्व शाखांचे शाखाअधिकारी,कर्मचारीवर्ग, दैनंदिन प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.