प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर : वेदगंगा दूधगंगा सहकारी साखर कारखान्यात एकत्र निवडणूक लढवल्यानंतर आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे असा सामना रंगला आहे. आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोघांची मैत्री तुटल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आज मतमोजणी होत असून यात कोण बाजी मारणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.आजरा साखर कारखान्यासाठी आज १९ डिसेंबर सकाळी मतमोजणीला प्रारंभ झाला असून. येथील पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरवात झाली. ४५ टेबलांवर दोन फेरीत मतमोजणी केली जात आहे. यासाठी २२५ कर्मचारी तैनात केले आहेत. दुपारी १ वाजेपर्यंत निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट होईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुजयकुमार येजरे, अमित गराडे यांनी सांगितले.