कोथळी ता.शिरोळ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा जाहीर नागरीक सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राजू शेट्टी यांच्या २०२४ च्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी लोकवर्गणीतून ५ लाख ५५ हजार ५५५ रूपयाची निधी देण्यात आली.
कोथळी गावाने आजपर्यंत चळवळीसाठी मोठे योगदान दिले असून माझ्या चळवळीच्या प्रवासात कोथळी गाव हे मोलाचे ठरले आहे. कोथळीकरांचे प्रेम हे निश्चीतच मला लढण्यासाठी बळ देणारे आहे. समस्त कोथळीकर ग्रामस्थांचा मी मनापासून ऋणी असल्याचे यावेळी शेट्टी यांनी मत व्यक्त केले.
ऊस दर आंदोलनाचा लढा यशस्वी केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांचा कोथळी येथील शेतकऱ्यांनी जल्लोषी स्वागत करून येणारी लोकसभा निवडणुक लढवायची आहे.
शिरोळ तालुक्यातील शेतकरी आपल्या पाठीशी आहे.
निवडणूक लागणारा निधी तुम्हाला अजीबात कमी पडणार नाही.पहिला हप्ता म्हणून कोथळी मधील शेतकऱ्यांच्या वतीने ५ लाख ५५५ हजारांचा निधी राजू शेट्टी यांच्या कडे सुपुत्र केला. यावेळी प्रमुख मार्गावरून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकर मादनाईक ,पंचायत समिती सदस्य राजगोंडा पाटील, शिरोळ तालुका अध्यक्ष राम शिंदे ,माजी सभापती सुवर्णाताई अपराज, श्रीकांत पाटील, विठ्ठल मोरे, शेतकरी व स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्वागत राजगोंड पाटील तर आभार गौतम पाटील यांनी मानले.