Kolhapur: ..अन्यथा ५३७ दूध संस्थांवर कारवाई; दुग्ध विभागाचा इशारा

0
198

कोल्हापूरः सहाव्या टप्प्यातील दूध संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत २०२२ मध्ये संपले आहे. मात्र संबंधित संस्थांनी अद्याप मतदार याद्या सादर केलेल्या नाहीत. अशा ५३७ संस्थांना तातडीने प्रारूप याद्या सादर करा.

अन्यथा प्रशासक नेमणुकीचे आदेश देण्यात येतील असा इशारा सहाय्यक निबंधक दुग्ध प्रदीप मालगावे यांनी दिला आहे.

कोरोना नंतर जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे यामध्ये सुमारे दोन हजार दूध संस्था निवडणुकीस पात्र होत्या सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाच्या सूचनेनुसार टप्प्याटप्प्याने निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे सहाव्या टप्प्यातील 537 दुध संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत 2022 मध्ये संपलेली आहे. या संस्थांनी वेळेत मतदार यादी सादर करणे अपेक्षित होते. पण त्या संस्था नी याद्या सादर केलेल्या नाहीत.

संबधितांनी वेळेत यादी सादर न केल्यास प्रशासक नेमणूकीची कारवाई करण्याच्या सुचना वरिष्ठ कार्यालयाने दिल्या आहेत. तरीसंस्था नी मतदार याद्या सादर कराव्यात, असे आवाहन प्रदीप मालगावे यांनी केले आहे.

याद्या सादर न केलेल्या तालुकानिहाय संस्था:

गगनबावडा १३, आजारा २७, करवीर ७५ ,कागल ४६ गडहिंग्लज ३७, चंदगड २७, पन्हाळा ५५, भुदरगड ५०,राधानगरी ८१, शाहूवाडी ६०, शिरोळ ३५ हातकलंगडे ३३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here