141 खासदारांना निलंबन केल्याबद्दल मोदी सरकारच्या विरोधात गारगोटी घोषणाबाजी व निदर्शने

0
78

गारगोटी प्रतिनिधी विजय बकरे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस पार्टी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने आज गारगोटी क्रांती चौकामध्ये 141 खासदारांचा निलंबन केल्याबद्दल मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आली

यावेळी बोलताना ⁠उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील म्हणाले की भारतीय जनता पार्टी व शिंदे सरकार हे सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या विरोधातल आहे

या सरकारनं संसदेमध्ये अधिवेशन चालू असताना ज्या खासदाराने कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी सभागृहात बोलत असताना विरोधी आघाडीतल्या खासदारांना निलंबन केलं हे लोकशाहीला घातक असून हे सरकार हुकूमशाही पद्धतीने राज्य सरकार व केंद्र सरकारवर बोलणाऱ्याच्या विरोधात गुन्हे दाखल करणे,

निलंबन करणे व त्यांच्या मालमत्तेच्या चौकशी लावणे असे एक विदारक चित्र सध्या देशांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते हे रोखण्यासाठी कष्टकऱ्यांनी शेतकऱ्यांनी ह्या लढाईमध्ये उतरून भाजप मुक्त देश करावा अशी भूमिका व्यक्त केली

यावी के.के.कांबळे,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शामराव दादा देसाई, यांनी भाजप सरकार विरोधात तीव्र भावना व्यक्त केली यावेळी काँग्रेसचे नेते जीवन दादा पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, सुरेश दादा नाईक, राजू काझी, मेरी डिसोझा, वसंत कांबळे,शिवसेना उपतालुकाप्रमुख अशोक पाटील, काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here