कोल्हापूरच्या तरुणाचा राधानगरी मध्ये संशयास्पद मृत्यू , मृत्यूचे कारण अस्पष्ट…

0
301

राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे

राधानगरी तालुक्यातील शेटकेवाडी इथल्या एकांत रिसॉर्ट मार्गावरील मोकळ्या जागेत शुक्रवारपेठ, कोल्हापूरमध्ये राहणारे शितल उदयराव कामत वय ३७ वर्षे या विवाहित तरुणाचा मृतदेह आढळला.मृत्यूचे नेमके कारण अध्याप स्पष्ट झालेलं नाही.

अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत.
शुक्रवारी सकाळी पावनेनऊच्या दरम्यान, शेटकेवाडी गावच्या हद्दीत एकांत रीसॉर्ट रस्त्याने आत गेलेवर असलेल्या मोकळया माळात शुक्रवार पेठ, कोल्हापुर इथे राहणारे शितल उदयराव कामत वय ३७ वर्षे यांचा मृतदेह आढळून आला.

मृत शीतल यांचा गुरुवारी लग्नाचा वाढदिवस होता.फिरून येतो म्हणून सांगून आपल्या इलेक्ट्रिक दुचाकीने घराबाहेर पडले होते.आज त्यांचा मृतदेह राधानगरी पोलिसांना आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी राधानगरी पोलिसात धाव घेतली.मृत शीतलच्या अंगावरील चेन,अंगठी आणि मोबाईल लंपास झाल्याचं नातेवाईकांनी सांगितलं.

उत्तरीय तपासणी राधानगरी रुग्णालयात करण्यात आली.राधानगरी पोलिसांनी इलेक्ट्रिक दुचाकी तपासासाठी ताब्यात घेतली आहे.अधिक तपास पोलीस सबइन्स्पेक्टर मेहश घेरडीकर,कृष्णात खामकर,गजानन गुरव यांच्यासह राधानगरी पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here