कराड तालुक्यातील रेठरे खुर्द गावचे सुपुत्र जवान हवलदार अनिल कळसे हे बुधवारी मणिपूर येथे देशसेवा बजावत हसताना शहीद झाले.त्यांच्या पार्थिव वर आज शनिवारी सकाळी रेठरे खुर्द येथे आणण्यात आले.
त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.भारतीय सेनेतील बॉम्बे इंजिनिअर ग्रुपमधील 267 इंजिनियर रेजिमेंट मध्ये ते कार्यरत होते.29 सप्टेंबर 2000 साली भारतीय सैन्य दलात भरती झाले होते.
देश प्रेमाने भरलेले ओतप्रोत मन ,सैनिक बनण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमानंतर झालेली निवड ही कुटुंबीयांचीच नाही तर संपूर्ण गावांचा अभिमान बनते.देशाच्या रक्षणाची जबाबदारी खडा पहारा कर्तव्य आणि धाडस पराक्रमाची परी सीमा हे सर्व एकवटते तेव्हा देशसेवेसाठी सैनिक तयार होतो.
सण समारंभ सुखाचा क्षण दुःखाचा डोंगर पचवत निधड्या छातीने शत्रूला नामोहरण करतो कुटुंबा पासून महिनोमहिने दूर राहतो.अशा या धाडसी जवानाला सलाम…
त्यांनी 23 वर्षे देश सेवा बजावली होती.त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये 267 इंजिनिअर रेजिमेंटमध्ये अतुलनीय कामगिरी करून रेजिमेंटचे नाव रोशन केले होते.
मणिपूर येथे गुरुवारी ते शहीद झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील ,भाऊ, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.गावामधून नागरिकांच्यातून हळहळ व्यक्त होत आहे.रेटरे खुर्द या गावांमध्ये सुट्टीवर आलेत की मन मनमिळावू स्वभावाचे असणारे अनिल कळस हे शहीद झाल्याचे समजताच गावावरती शोककळा पसरली.