SP9 कोकरूड /प्रतिनिधी प्रतापराव शिंदे
वारणा-कानसा खोऱ्यातील आदर्शवत व्यक्तिमत्व व धन्वंतरी हाॅस्पिटल कोकरूडचे संस्थापक आदरणीय डॉ. एस. एन .पाटील( बापू )यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त जांबूर ता शाहुवाडी येथे डॉ. एस. एन. पाटील फाउंडेशन ,आनंदराव मांईंगडे चॅरिटेबल ट्रस्ट, स्वामी विवेकानंद कला क्रीडा मंडळ, महाजन कन्सर्स एच. पी.गॅस एजन्सी शिराळा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी औषधोपचार व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरास विरळे, जांबूर परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिराचा सुमारे 2७५ जणांनी लाभ घेतला. तर सुमारे २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी शिबीराचे उद्घाटन माजी बांधकाम व आरोग्य सभापतीं जिल्हा परिषद कोल्हापूर सर्जेराव पाटील- पेरीडकर, दत्तसेवा समुहाचे संस्थापक आनंदराव मांईंगडे, जांबूरचे सरपंच दिलीप निकम, माजी सरपंच बाजीराव डीगे, विरळेचे माजी सरपंच कृष्णा पाटील, तुरुकवाडीचे माजी सरपंच आर. एस. पाटील, आदींच्या हस्ते करण्यात आले.
या भव्य शिबिरामध्ये मुळव्याध, रक्तातील साखर, हृदयरोग, स्त्रीरोग, बालरोग, हाडांची, डोळे ,त्वचा तसेच मेंदू व मणक्याची तपासणी करण्यात आली. यावेळी तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना सुमारे ४ लाखांची मोफत औषधे वाटप करण्यात आली. यावेळी डॉ. एस एन पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन उषा शिवाजीराव पाटील, प्रा. डॉ. एच. पी. पाटील, माजी चेअरमन डॉ.एन. पी. पाटील, माजी सरपंच शिवाजीराव सोनवले, व्हा. चेअरमन प्रा. अजय पाटील, संचालक शंकर पाटील, शंकर बामणे,अमर पाटील, कृष्णात पाटील, डॉ. पंकज पाटील, एच. पी. गॅस एजन्सी शिराळाचे श्रेयस महाजन,जनरल मॅनेजर तानाजी बामणे, कर्ज मंजुरी अधिकारी सुमंत माळी, प्रशासकीय अधिकारी संजय पाटील, कर्ज वसुली अधिकारी युवराज मांईंगडे, जांबूर येथील जगन्नाथ पाटील, बळवंत कोठारी ,मारुती पाटील, रंगराव भोसले, केशव डिगे, सुरेश पाटील, संजय पाटील ,किसन पाटील, जालिंदर लोहार, सौ. आनंदी पाटील ,सौ. लक्ष्मी पाटील, कोल्हापूर येथील डॉ. एम. बी. पोतदार, डॉ. अवधूत देशपांडे, दत्तसेवा पतपेढीचे लक्ष्मण पाटील, दत्तसेवा विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश पाटील, प्रमोद पाटील, चरणचे शाखाधिकारी हरीभाऊ पाटील, मलकापूर शाखाधिकारी रमेश गिंडे, शिराळा शाखाधिकारी अनिल सावंत, तुरुकवाडी शाखाधिकारी विद्या धस, सागर खांडेकर, सागर मांईंगडे, युनूस मुलाणी आदींसह सांगली व ईस्लामपूर भागातील औषध वितरक, डॉ. एस. एन. पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.