. प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर : ‘‘राज्यात जेएन. १ कोरोनाचा (JN. 1 Corona) शिरकाव झाला आहे. या पाठोपाठ कोल्हापुरात गुरुवार दि २२ डिसेंबर कोल्हापुरात १२ वर्षीय अल्पवयीन मुलगा कोरोनाबाधित सापडला होता. त्याला घरात क्वारंटाईन केले आहे. तो कोरोनाबाधित होता
आयसोलेशनमध्ये चाचणी झाली; तेव्हा त्याचा अहवाल कोरोनाबाधित आला. त्याला घरीच क्वारंटाईन केले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, त्याच्या थुंकीचा नमुना राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठवला होता. त्याचा अहवाल आज रविवार २४ डिसेंबर रोजी आला आहे असुन त्याचा चाचणी अहवालात त्याला jn 1या व्हेरियट ची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला सद्या कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. दरम्यान जिल्ह्यात ३३ लाख लोकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झाल्याने कोरोनाचा धोका टळला आहे. असे असले तरी ज्यांना गंभीर आजार आहेत, अशा व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. अशा व्यक्तींनी जास्त खबरदारी घेण्याची गरज असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशीर मिरगुंडे म्हणाले, ‘‘कोरोनाचा जेएन. १ व्हेरिएंट वेगाने पसरणारा असला, तरी तो जीवघेणा नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. सीपीआरमध्ये कोरोना उपचारासाठी स्वतंत्र कक्ष आहे. ३५ आयसीयू बेड आहेत. चाचणीसाठी जिल्हा प्रयोगशाळा आहे. वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक येथे आहे. औषध साठाही पुरेसा आहे. त्यामुळे लक्षणे दिसताच रुग्णांनी घाबरून न जाता तातडीने तपासणी व उपचार घ्यावेत.