म्हापसेकर तिठा येथे कुडाळ पोलिसांनी छापा टाकून ४५ हजार २०० रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त

0
68

कुडाळ, दि.२५: पिंगुळी – म्हापसेकर तिठा येथे कुडाळ पोलिसांनी छापा टाकून ४५ हजार २०० रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली. तसेच याप्रकरणी संदीप चंद्रकांत गावडे (३८ रा. पिंगुळी – नवीवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई शनिवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याबाबतची फिर्याद पोलीस कर्मचारी स्वप्नील जगन्नाथ चव्हाण यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. पिंगुळी – म्हापसेकर तिठा येथे विनापरवाना गोवा बनावटीची दारू विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार कृष्णा परुळेकर, दयानंद चव्हाण व स्वप्नील चव्हाण त्या परिसरात गेले. तेथील सिद्धिविनायक कोल्ड्रिंक्सच्या पाठीमागील मोकळ्या जागेत दारू विक्री सुरू होती. तेथे असलेला संदीप चंद्रकांत गावडे याच्याकडील सिमेंटच्या पिशवीची पोलिसांनी तपासणी केली. तेव्हा त्यांना त्या पिशवीत दारूच्या बाटल्या आढळल्या. यामध्ये बुलेट ७७ व ओल्ड कॅश्यु फेनीच्या १६ हजार ८०० रुपये किंमतीच्या ८४ बाटल्या, हायवर्ड, फाईन विस्की १४ हजार रुपये किमतीच्या ७० बाटल्या, बॉबस लेमन व्होडका ९ हजार ६०० रूपये किमंतीच्या ४८ बाटल्या, देशी दारू टेंगोच्या ४ हजार ८०० रुपये किंमतीच्या ४८ बाटल्या असा ४५ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संदीप गावडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कुडाळच्या पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली परुळेकर तपास करीत आहेत.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here