प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा
दिल्ली : नवी दिल्लीत धुक्याची चादर पसरली आहे. दरम्यान विमान वाहतूक प्रशासन औरेज अलर्ट वर आहे . धुक्यामुळे दिल्लीतील विमानसेवेचे सर्व वेळापत्रक कोलमडले आहे.
सकाळी दाट धुक्यामुळे दृष्यमानता फारच कमी झाली होती त्यामुळे स्पष्ट काहीही दिसत नव्हते. त्यामुळे तब्बल १०० पेक्षा जास्त विमान उड्डाणांना विलंब झाला. वैमानिकांना पुढील दृष्य स्पष्टपणे दिसावे, यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते.
परंतु याचा काहीही फायदा झाला नाही. यामुळे जवळपास १८ विमानांच्या उड्डाणांना जास्त विलंब लागला आहे. तसेच वेगवेगळ्या ठिकाणांहून येणाऱ्या ८ फ्लाईट्स इतर ठिकाणी वळवण्यात आल्या आहेत.