प्रतिनिधी : प्राध्यापिका मेघा पाटील
109 टी ए मराठा बटालियनचे पहिलेशहीद वीरअभिजीत सूर्यवंशी ट्रस्टतर्फे आज बेस्ट जवान ऑफ द इयर या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.शहीद वीर अभिजीत निवास साकोली कॉर्नर शिवाजी पेठ येथे हा कार्यक्रमसंपन्न झाला.शहीद वीरांना मानवंदना देण्यात आली तसेच आजी-माजी सैनिकांच्या मुला-मुलींना दहावी बारावी परीक्षेतील यशाबद्दल पारितोषिक प्रदान करण्यात आले.शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली.तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते वीर अभिजीत सूर्यवंशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केले.जवान अजित नलावडे यांना यावर्षीचा बेस्ट जवान ऑफ द इयर पुरस्कार देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले.या पुरस्काराचे स्वरूप शाल ,मानपत्र आणि सन्मान चिन्ह असे होते.
ऑनररी कॅप्टन अशोक पवार म्हणाले सैनिकांप्रती कायम कृतज्ञता बाळगा .विद्यार्थ्यांनीही सैनिकांकडून प्रेरणाा घ्यावी.कोल्हापूर जिल्ह्यात 186 जवान शहीद झाले आज त्यांच्या कुटुंबीयांना काय मिळाले हे आपण पाहिले पाहिजे.यासाठी आम्ही अशा कुटुंबांशी संवाद साधून जी शासकीय मदत मिळेल ती देण्याचा प्रयत्न करत आहोत.109 मराठा बटालियनचे सुभेदार राजेश सावंत म्हणाले सूर्यवंशी ट्रस्ट तर्फे आजी-माजी सैनिकांचा सन्मान केला जातो.दहावी बारावीच्या मुला मुलींना ही पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते हे काम खूप महत्त्वाचे आहे.गेले 23 वर्षे समाजासाठी असे काम सुरू आहे या चा आम्हाला अभिमान वाटतो.याप्रसंगी ऑनररी कॅप्टन संजय चौगुले,माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी मनोगत व्यक्त केले.ट्रस्टचे कार्याध्यक्ष नितीन सूर्यवंशी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.
यावेळी कोल्हापुरचे प्रसिद्ध लेखक कार्यक्रमाचे सुत्रसंचलाक श्री.युवराज पाटील ,कोल्हापुरच्या १०९ TA मराठा बटालियनचे सुभेदार राजेश सावंत , कोल्हापूरचे सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अधिकारी श्री. अशोक पांडुरंग पोवार (सेवानिवृत्त), शहीद जवान अभिजीत मदनराव सूर्यवंशी यांच्या वीर माता श्रीमती मनीषा मदनराव सूर्यवंशी, स्नेहल सूर्यवंशी, कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिराचे श्री पुजक अजित ठाणेकर,सूर्यवंशी कुटुंबतील सदस्य ,ट्रस्टचे पदाधिकारी, आजी-माजी सैनिक आणि नागरिक उपस्थित होते.