सलमान खानचं खरं नाव माहितीये का? इंडस्ट्रीत आल्यावर अभिनेत्याने बदललं नाव

0
107

दमदार अभिनयशैली, पिळदार शरीरयष्टी आणि हटके स्वॅग यांच्या जोरावर गेल्या गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करणारा अभिनेता म्हणजे सलमान खान (salman khan). ९० च्या काळात अनेक सुपरहिट सिनेमा देणाऱ्या सलमानचा आजही बॉलिवूडमध्ये दबदबा आहे.

त्यामुळेच आज जो दबंग खान, सल्लूभाई, भाईजान अशा कितीतरी नावांनी ओळखला जातो. परंतु, सलमान खान या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याचं खरं नाव काही वेगळंच आहे. विशेष म्हणजे त्याचं हे नाव आजही अनेकांना ठावूक नाही.

इंडस्ट्रीत येणाऱ्यापूर्वी अनेक कलाकारांनी त्यांचं नाव बदललं आहे. यात अक्षय कुमार, कियारा आडवाणी, आयुष्मान खुराना, टायगर श्रॉफ, सनी देओल, अजय देवगण यांसारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यांच्या यादीत सलमानाही समावेश आहे. सलमानने सुद्धा त्याचं नाव बदललं आहे.

काय आहे सलमान खानचं खरं नाव?

गेल्या अनेक दशकांपासून सलमान खान या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याचं खरं नाव आज अनेकांना माहित नाही. इतकंच कशाला कदाचित त्याच्या चाहत्यांनाही ठाऊक नसेल. सलमानने इंडस्ट्रीत आल्यावर त्याचं नाव बदललं. त्याचं खरं नाव त्याचे आजोबा आणि वडील सलीम खान यांनी मिळून ठेवलं होतं.

दरम्यान, सलमान खानचं खरं नाव अब्दुल रशीद सलीम सलमान खान असं आहे. इंडस्ट्रीत आल्यावर त्याने त्याचं नाव बदललं आणि फक्त सलमान खान इतकंच ठेवलं. आज हा अभिनेता सल्लूमियाँ, भाईजान, दबंग खान यांसारख्या टोपणनावानेही ओळखला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here