लग्नाच्या आमिषाने पळवून नेत अत्याचार, आरोपीला १० वर्षे कैद

0
72

अल्पवयीन मुलीला जबरदस्ती पळवून नेत तिच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्या आरोपी सतीश तुकाराम जोगे (२७ रा. पवनार) याला १० वर्षाच्या सश्रम कारवासाची तसेच पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठाविण्यात आली.

अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश व्हि.टी. सुर्यवंशी यांनी दिला.

प्राप्त माहितीनुसार, पीडितेच्या मोठ्या बहिणीची प्रसुती झाल्याने तिचे वडिल व आई रुग्णालयात होती. दरम्यान ४ ऑक्टोबर २०१६ रोजी पीडिता ही सेवाग्राम येथील रुग्णालयात बाळाला पाहण्यासाठी गेली.

बाळाला पाहून ती घरी जाण्यास निघाली असता रात्री ८ वाजता पीडितेला आरोपी सतीश जागे याने पळवून नेल्याची माहिती मिळाली. या संशयातून पीडितेच्या वडिलांनी सिंदी रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांच्या तपासात ७ नोव्हेंबर २०१६ रोजी मिळून आली. तिने दिलेल्या बयाणात सांगितले की, तिच्या मैत्रीणीच्या मोठ्या बहिणीचे आरोपी सतीशच्या भावासोबत लग्न झाल्याने पीडिता वरातीसोबत आरोपीच्या घरी गेली होती. दरम्यान दोघांत ओळख झाल्यानंतर पीडिता व आरोपी एकमेकांशी बोलू लागले. आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दिले.

४ ऑक्टोबर रोजी पीडितेला फोन करुन पवनार येथे भेटण्यासाठी बोलावले. तेव्हा पीडिता ही आरोपीच्या घरी पवनार येथे दोन दिवस राहिली. ६ ऑक्टोबर २०१६ रोजी आरोपी पीडितेनला सिंदेवाही येथे त्याच्या नातेवाईकाकडे घेऊन गेला.

तेथे तीन दिवस राहिल्यानंतर आरोपीने त्या गावी किरायाने रूम केली. तेथे आरोपीने पीडितेसाेबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तेथे ४ ते ५ दिवसांनी पोलिस आले आणि पीडिता व आरोपींना सिंदी पोलिस ठाण्यात घेऊन गेले.

याप्रकरणाचा प्राथमिक तपास पोलिस उपनिरीक्षक आकाश शाही यांनी केला व नंतरचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी माधव पडीले यांनी केला. तपासा दरम्यान आरोपीने गुन्हा केल्याचा पुरावा उपलब्ध झाल्यामुळे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

सरकार तर्फे विशेषः सरकारी अभियोक्ता विनय आर. घुडे यांनी कामकाज पाहीले. त्यांना सदर प्रकरणात अॅड. स्वाती एन. गेडे (दोडके) यांनी मदत केली तसेच सदर प्रकरणात पैरवी सहा. फौजदार आनंदा कोटजावरे यांनी साक्षदाराना हजर करून मोलाची कामगीरी बजावली.

शासनातर्फे एकूण सात साक्षदार तपासण्यात आले. पीडिता, पीडितेचे वडील, वैद्यकीय अधिकारी व इतर साक्षदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायाधीश सुर्यवंशी यांनी १० वर्षें सश्रम कारवास व ५ हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here