थंडीत ताज्या पेरूचे करा चटपटीत लोणचं; पेरू वापरून ५ मिनिटात होतील ३ रेसिपीज, चवीला भारी

0
96

हिवाळ्याच्या (Winter Special Recipes) दिवसांत बाजारात ताजे पेरू भरपूर विकले जातात. पेरू असेच तर तुम्ही नेहमीच खात असाल. ताज्या पेरूचा वापर तुम्ही वेगेवगळ्या पदार्थांमध्येही करू शकता.

(Cooking Hacks) जेवताना तोंडी लावण्यासाठी पेरूचे लोणचं, चटणी, भाकरीबरोबर खाण्यासाठी पेरूची चटपटीत, चविष्ट भाजी किंवा नैवेद्याला दाखवण्यासाठी पेरूची खीर असे वेगेवगळे पदार्थ पेरूचा वापर करून तुम्ही बनवू शकता. (How to Make Guava Chat And Guava Pickle)

1) पेरूचे लोणचं (Guava Pickle Recipe)

चटपटीत पेरूचं लोणचं करण्यासाठी सगळ्यात आधी ताजे पेरू स्वच्छ धुवून घ्या. शक्यतो पिकलेले पेरू असतील असे पाहा. पेरूच्या बारीक फोडी करून घ्या. पेरूमध्ये लाल तिखट, मीठ, चाट मसाला आणि लिंबू घालून एक पदार्थ तयार करून घ्या. तयार आहे चटपटीत पेरू चाट. याला तुम्ही पेरूचे लोणचंही म्हणू शकता. पेरूचं इस्टंट लोणचं करण्याची ही सोपी पद्धत आहे.

२) पेरूची भाजी (Guava Sabji)

पेरूचे लांब लांब तुकड्यांमध्ये कापून एका बाजूला ठेवून द्या.. एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात जीऱ्याची फोडणी द्या. नंतर त्यात हिंग, लाल मिरची, धणे पावडर, मीठ आणि हळद मिसळा. त्यात दही आणि टोमॅटोचे काप घालून ५ मिनिटं परतवून घ्या. त्यात १०० मिलीलिटर पाणी घालून पुन्हा उकळून घ्या. नंतर पेरू घालून चमच्याने मिसळून झाकण लावून शिजवून घ्या. त्यात बडीशेप, साखर, आमसूल पावडर आणि गरम मसाला घाला. लिंबाचा रस घालून पुन्हा एकजीव करून घ्या. पुरी किंवा चपातीबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here