कापसाला बाजारात किती मिळतोय दर?

0
89

यंदाच्या कापसाला योग्य बाजारभाव नसल्याने शेतकरी नाराज आहेत. त्याचबरोबर एक दोन बाजार समित्या सोडल्या तर एकाही बाजार समितीमध्ये हमीभावाएवढा दर मिळताना दिसत नाही. केंद्र सरकारने लांब धाग्याच्या कापसाला ७ हजार २० रूपये प्रतिक्विंटल दर जाहीर केला असतानाही बाजार समित्यांमध्ये एवढा दर मिळत नाही.

परिणामी शेतकऱ्यांना मातीमोल दराने कापसाची विक्री करावी लागत आहे.

दरम्यान, पणन मंडळाच्या माहितीनुसार आज बाजार समित्यांमध्ये लोकल, लांब स्टपल, मध्यम स्टेपल, एच -४ – मध्यम स्टेपल, एचकेएच – ४ – लांब स्टेपल या कापसाची आवक झाली होती. आज राळेगाव बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजे ६ हजार ५०० क्विंटल कापसाची आवक झाली होती. या ठिकाणी ६ हजार ९३० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला असून ७ हजार २० रूपये कमाल दर मिळाला आहे.

तर अकोला बोरगावमंजू या बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त सरासरी दर ७ हजार १५० रूपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला आहे. त्यापाठोपाठ मनवत बाजार समितीमध्ये ७ हजार ७५ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. दरम्यान, वरोरा-माढेली बाजार समितीमध्ये सर्वांत कमी म्हणजे ६ हजार ४०० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे. आज बहुतांश बाजार समित्यांमध्ये साधारण ६ हजार ४०० ते ६ हजार ८०० च्या दरम्यान सरासरी दर मिळाला आहे.

आजचे सविस्तर कापसेच दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/01/2024
सावनेरक्विंटल3500675067756775
राळेगावक्विंटल4300650070206930
समुद्रपूरक्विंटल1001660070256800
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल538600068506650
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल580675068256775
अकोलालोकलक्विंटल51683068806855
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल93700072507125
उमरेडलोकलक्विंटल431660068006650
मनवतलोकलक्विंटल1200630071257075
देउळगाव राजालोकलक्विंटल3150620070556900
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल1000600069256400
काटोललोकलक्विंटल122640068006700
हिंगणालोकलक्विंटल13662567506625
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल830655070456950
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल1700610071506500
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल123660068006700

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here