गुरूवार ४ जानेवारी २०२४ चे दिनविशेष शुभाशुभ मुहूर्त जाणून घेऊया आज मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी आहे. आज कालाष्टमी आहे. आज हस्त नक्षत्र आहे. आज दिवस शुभ आहे.

0
87

आजचे शुभाशुभ मुहुर्त जाणून घेऊया

सिध्दी :- सकाळी ७:१२ ते ८:३५
लाभ :- दुपारी १२:४३ ते २:०५
अमृत :- दुपारी २:०५ते ३:२८
राहू काळ : सकाळी १:३० ते ३:००
राहू काळ मध्ये महत्वाची कामे करू नये.
चला पाहूया आजचे राशिभविष्य

मेष आर्थिक राशीभविष्य


आज आपल्या जोडीदारासमवेत छान, मजेत वेळ व्यतीत कराल. जोडीदाराचे भरभरून प्रेम व सहकार्य लाभेल आपणही जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिकांसाठी देखील उत्तम दिवस असेल.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समाधान आणि शांतीचा असून आज राजकीय क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. सरकारी कामे मार्गी लागतील तसेच चांगला पाठिंबा मिळेल. तुम्हाला नवीन कराराचा फायदा होईल आणि योजना यशस्वी होतील. तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढेल तसेच मान-सन्मान मिळणार आहे. काही अप्रिय लोकांच्या भेटीमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.

मिथुन आर्थिक राशीभविष्य

मिथुन आर्थिक राशीभविष्य

मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत नशीबाची चांगली साथ मिळणार आहेत पण आज तुमची एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची भीती आहे तेव्हा सावध रहावे. मुलांना शैक्षणिक किंवा स्पर्धा परीक्षेत अनपेक्षित यश मिळाल्यामुळे तुमचा दिवस अगदी आनंदात जाणार आहे. कोणतेही रखडलेले काम पूर्ण होईल त्यामुळे तुम्ही नव्या जोमाने पुढील कामे करु शकता. एखाद्या मंगलमय कार्यक्रमात सहभागी होण्याचे सौभाग्य प्राप्त होणार आहे

कर्क आर्थिक राशीभविष्य

कर्क आर्थिक राशीभविष्य

कर्क राशीच्या लोकांना नशीब साथ देत असून तुम्हाला संपत्ती मिळणार आहे. तुमच्या उपजीविकेच्या क्षेत्रात प्रगती दिसून येत असून तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. मुलांच्या जबाबदाऱ्या तुम्ही योग्य पद्धतीने पार पाडत आहात. आज प्रवास घडू शकतो पण त्यात तुम्हाला लाभच होणार आहे. आज आवडती व्यक्ती भेटणार असून तुम्हाला एखादी चांगली बातमी समजेल ज्यामुळे समाधान प्राप्त होईल.

सिंह आर्थिक राशीभविष्य

सिंह आर्थिक राशीभविष्य

सिंह राशीच्या लोकांना आर्थिक बाबीत मोठा फायदा होणार आहे. तसेच तुमचे
उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील. तुमच्या वाणीमधील गोडवा आणि कृतीमधील संयम यामुळे तुम्हाला मान-सन्मान मिळेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. शिक्षण आणि स्पर्धेत यश मिळेल तसेच नशीबाची उत्तम साथ मिळेल. आज धावपळ जरा जास्त झाल्यामुळे थकवा येवू शकतो. तुमचे शत्रू आज आपापसात भांडतील आणि नष्ट होतील.

कन्या आर्थिक राशीभविष्य

कन्या आर्थिक राशीभविष्य

कन्या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल आणि रोजगार व्यवसायाच्या क्षेत्रात सुरू असलेले प्रयत्न यशस्वी होतील. मुलांच्या बाजूने ही समाधानकारक बातमी मिळेल. दुपारनंतर कायदेशीर वाद किंवा खटल्यात तुमच्या बाजून निकाल लागणार असून तुम्ही विजयी होणार आहात. चांगल्या कामासाठी खर्च होणार आहे पण त्यातून तुमचा मान-सन्मान वाढणार आहे. आज तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जाणार आहे.

तुळ आर्थिक राशीभविष्य

तुळ आर्थिक राशीभविष्य

तुला राशीच्या लोकांचे नशीब तुम्हाला साथ देईल आणि आज तुमच्या आजूबाजूला आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आनंदात वाढ होईल आणि अनेक दिवसांपासून सुरू असलेली व्यवहारांची कोणतीही मोठी समस्या दूर होऊ शकेल. पुरेसा पैसा मिळेल आणि तुमच्या अडचणी दूर होतील. विरोधकांचा पराभव होईल. तुमच्यासाठी प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध सुधारतील.

वृश्चिक आर्थिक राशीभविष्य

वृश्चिक आर्थिक राशीभविष्य

वृश्चिक राशीच्या लोकांना फायदा होईल आणि तुमचा मान-सन्मान वाढेल. मात्र आज
डॉक्टरांकडे तुमच्या फेऱ्या वाढणार आहेत तुमची किंवा घरातील सदस्याची तब्येत बिघणार आहे. आजा पूर्ण दिवस डॉक्टरांचा सल्ला घेण्यात घालवावा लागणार असे दिसते आहे. पण त्याचबरोबर व्यवसाय करणाऱ्या वृश्चिक राशीच्या लोकांच्या योजना सफल होताना दिसत आहेत.

धनु आर्थिक राशीभविष्य

धनु आर्थिक राशीभविष्य

धनु राशीच्या लोकांसाठी भाग्योदयाचा दिवस आहे असेच म्हणावे लागेल. तुमची
सत्ताधारी पक्षाशी असलेली जवळीक आणि युतीचा फायदाही तुम्हाला होणार आहे. तुमची कामे पूर्ण होतील. सासरच्या मंडळींकडून भरीव रक्कम मिळू शकते. सायंकाळपासून रात्रीपर्यंत सहलीला जाण्यासाठी योग दिसतो आहे. सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.

मकर आर्थिक राशीभविष्य :

मकर आर्थिक राशीभविष्य :

मकर राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत यश मिळेल. उपजीविकेच्या क्षेत्रात सुरू असलेले नवे प्रयत्न फलदायी ठरतील. तुमच्या सोबत असणारे सहकारी तुम्हाला कामात मदत करणार आहेत. त्यांच्या सहकार्यामुळे तुमची कामे पूर्ण होणार असून तुमचा सन्मान होणार आहे. संध्याकाळी कोणत्याही भांडणात पडू नका. रात्री पाहुणे घरी येणार आहेत तेव्हा स्वागताची जय्यत तयारी करुन ठेवा. पालकांची विशेष काळजी घ्या. आज संध्याकाळी अचानक कुठून तरी पैसे मिळू शकतात.

कुंभ साप्‍ताहिक आर्थिक राशीभविष्य

कुंभ साप्‍ताहिक आर्थिक राशीभविष्य

कुंभा राशीसाठी कार्यक्षेत्रात कोणते तरी दोन प्रकल्प तुमच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करतील. आर्थिकस्थिती ठिकठाक राहील आणि निष्काळजीपणामुळे नुकसान होईल. प्रकृतीत थोडा सुधार दिसेल. कुटुंबाच्या सहवासात सुखद वेळ घालवाल, आणि आज कुटुंबासोबत भविष्याचे नियोनज कराल. आठवड्यात प्रवास टाळलेला बरा. या आठवड्याच्या अखेरीस जीवनात सुखसमृद्धीचे योग बनताना दिसतता.

मीन साप्‍ताहिक आर्थिक राशीभविष्य

मीन साप्‍ताहिक आर्थिक राशीभविष्य

मीन राशीसाठी आर्थिक विषयांत हा आठवडा शुभ आहे आणि धनलाभाचे शुभ योग बनत आहेत. नवीन गुंतवणूक तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन येईल. कार्यक्षेत्रात तुम्हाला लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. या आठवड्यात कुटुंबातील सर्वांचे ऐका पण कृती करताना स्वतःचे मनाचे ऐका, त्यातून तुम्हाला सुख मिळेल. प्रवासातून साधारण यश मिळेल. या आठवड्याच्या अखेरीस सुखसमृद्धीचे योग आहेत. भागीदारीता केलेली कामे शुभ परिणाम देतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here