प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा.
सांगली: सांगली येथील कारागृहासमोरून संशयित आरोपीनं बेड्यासह पलायन केलं आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. लक्ष्मण चौगुले असं या आरोपीचं नाव आहे. पसार झालेल्या चौगुलेच्या शोधासाठी सांगली पोलिसांकडून विशेष पथक नेमण्यात आले आहेत. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सांगलीच्या कारागृहासमोरून एका संशयित आरोपीने पलायन केल्याचा प्रकार घडला आहे. लक्ष्मण चौगुले,असे या संशयित आरोपीचं नाव आहे. एका गुन्ह्यामध्ये लक्ष्मण चौगुले हा सांगली कारागृहामध्ये अटकेत होता. शनिवारी वैद्यकीय तपासणीसाठी लक्ष्मण चौगुले याला बाहेर काढण्यात आलं होतं.वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर पुन्हा तुरुंगात घेऊन येत असताना, तुरुंगासमोर आल्यावर चौगुले याने पोलिसांना हिसडा मारून बेड्यासह धूम ठोकली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. पसार झालेल्या चौगुलेच्या शोधासाठी आता सांगली पोलिसांकडून विशेष पथके नेमण्यात आली आहेत, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.