Bollywood News: कोरोना काळात चित्रपटसृष्टी पूर्णपणे ठप्प झाली होती. लॉकडाऊनमुळे जवळपास दोन वर्षे सिनेमागृहात चित्रपट रिलीज झाला नाही. अनेक बिग बजेट चित्रपटही ओटीटीवर येऊ लागले. पण, गेल्या काही महिन्यांपासून सिनेसृष्टीने वेग पकडला आहे.
एका पाठोपाठ एक हिट चित्रट येत आहेत. गेल्या शुक्रवारी बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील काही बिग बजेट चित्रपट रिलीज झाले, ज्यावर चाहते तुटून पडले.
सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘जेलर’, अक्षय कुमारचा ‘ओएमजी 2’, सनी देओलचा ‘गदर 2’ आणि चिरंजीवीचा ‘भोला शंकर’, हे बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाले. एकाच दिवशी हे सर्व चित्रपट रिलीज होत असल्यामुळे सर्व चित्रपटांना नुकसान होण्याचा मोठा होता. मात्र, या सर्व चित्रपटांच्या कमाईने चाहत्यांसह चित्रपट विश्लेषकही चकीत झाले. या चार चित्रपटांनी मिळून चित्रपटसृष्टीचा इतिहासच बदलून टाकला.